बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न ; भाजपचे जि.प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या सह तिघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न ; भाजपचे जि.प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या सह तिघांच्यावर पोलिसात गुन्हा दाखलसांगली : भिलवडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य  सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह तिघांच्या विरोधात बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाणेत दाखल झाला आहे. सांगली येथील बांधकाम व्यवसायिक राहुल तावदर यांचा अपहरण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून  सावकारी, अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल झाले आहेत.


राहुल तावदर यांच्या वडिलांनी सुरेंद्र वाळवेकर यांच्याकडून चार वर्षांपूर्वी जमिनीच्या व्यवहारासाठी 15 लाखांचे कर्ज घेतलं होतं. ते पैसे परत केले होते. मात्र वाळवेकर यांच्याकडून व्याजासाठी तगादा लावण्यात आला होता. दोन महिन्यांपासून हा तगादा सुरू होता. त्यातून शनिवारी सांगलीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी सुरेंद्र वाळवेकर यांनी राहुल तावदर यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल झाली, असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (सोर्स-सामTV)


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments