Type Here to Get Search Results !

राज्यात “या” ठिकाणी तयार होते ‘रेमेडेसिवीर इंजेक्शन’ व ‘एम्फोटेरेसिन-बी’ हे औषध : कंपनीला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट : प्रतिदिन २० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादनवर्धा : रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसीमधील जेनेटिक लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीमध्ये तयार होणाऱ्या सर्व औषधांबाबत माहिती जाणून घेतली.दुसऱ्या लाटेच्या शिखर कालावधीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना जेनेटिक लाईफ सायन्सेस यांनी रेमडेसिवीर औषध तयार करण्यास पुढाकार घेतला. त्यासाठी केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी,  केंद्र व  राज्य शासन, अन्न व औषध प्रशासन विभाग, आणि हैदराबाद येथील हेटरो या मल्टी नॅशनल कंपनीने केलेल्या सहकार्यामुळे वर्धा जिल्ह्यात अगदी कमी कालावधीत औषध तयार करण्यासाठी मान्यता मिळाली असे श्री. शिंगणे यावेळी म्हणाले. रेमडेसिवीर औषधाची निर्मिती सुरू झाली त्याचवेळी भेट देणार होतो, मात्र त्यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयासाठी लागणारा ऑक्सिजनची मागणी आणि निर्मितीमध्येही तफावत निर्माण झाली होती. त्याच्या पूर्ततेमध्ये व्यस्त असल्यामुळे येणे शक्य झाले नसल्याचे श्री शिंगणे यांनी यावेळी सांगितले.सध्या प्रतिदिन 20 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन तयार होत असल्याची माहिती श्री क्षीरसागर यांनी दिली. म्युकरमायकोसिस वरील उपचारात उपयुक्त असलेले एम्फोटेरेसिन-बी हे औषधही वर्धा जिल्ह्यातून तयार होत असून यासाठी जेनेटिक लाईफ सायन्सेस केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कंपनीचे डॉ महेंद्र क्षीरसागर, माजी आमदार सुरेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सतीश चव्हाण व इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies