Type Here to Get Search Results !

भारताच्या “या” प्रसिद्ध धावपटूचे वयाच्या ९१ वर्षी निधन ; सलग चार वेळ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते



चंदीगड : भारताचे माजी दिग्गज प्रसिद्ध धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे.




मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल पंत प्रधान नरेंद्र मोदी , राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies