Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. अनेक नागरिक कोरोना बाधित झाले होते. नागरिकांना आरोग्य सेवा वेळत मिळण्यास विलंब झाल्याने अनेक नागरिक कोरोनाने मृत्युमुखी पडले. परंतु लॉकडाऊन नंतर परिस्थिती सुधारू लागली व कोरोनाची लाट आटोक्यात आली. परंतु आता मात्र कोरोनाचे बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दिनांक १९ रोजी आटपाडी तालुक्यात ४२ नवे रुग्ण आढळून आले असून १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४२ रूग्णापैकी १० रुग्ण इतर तालुक्यातील आहेत.





बाधित रूग्णामध्ये आटपाडी ०७, बनपुरी ०१, दिघंची ०१, एखतपूर ता.सांगोला ०४, घाणंद ०१, गोमेवाडी ०१, हिवतड ०४, कटफळ ता.सांगोला ०२, कौठूळी ०२, खरसुंडी ०२, कुरुंदवाडी ता.माण ०२, लिंगीवरे १, लोणारवाडी ता.पंढरपूर १. माडगुळे ०१, मापटेमळा ०५, पिंपरी खुर्द ०२, विठ्ठला पूर ०४, वरकुटे ता. माण ०१ या गावातील रुग्णांचा बाधितामध्ये समावेश आहे.





आज आलेल्या बाधित रूग्णामध्ये पुरुष रुग्ण २२ तर स्त्री रुग्ण २० असे एकूण ४२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies