खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

 
अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर यावर आता सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आला आहे. जात प्रमाणपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे. 


न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अश्या न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिल्याचंही नवनीत राणा यांनी पत्रामध्ये म्हणाल्या होत्या.


यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी खासदार नवनीत राना यांचे वकील जेष्ठ विधिज्ञ ऍड ढाकेपालकर आणि ऍड गाडे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर तुर्तास नवनीत राणा यांना दिलासा देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured