Type Here to Get Search Results !

मनोज पाटील आत्महत्या प्रकरण I अखेर “या” अभिनेत्यावर गुन्हा दाखल



मुंबई : ‘मिस्टर इंडिया’ पुरस्कार विजेता आणि भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेल्या मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला असून या प्रकरणी अभिनेता साहिल खान याच्यासह अन्य तिघावर मनोज पाटील यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





आपल्या व आपल्या पत्नीमधील असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचे मनोज पाटील याने साहिल खानवर आरोप केले आहेत. तसेच यामुळे अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल, असेही त्याने म्हटले आहे. आपल्या कुटुंबियांना या सर्व गोष्टींचा त्रास होत असून साहिल खानवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती मनोज पाटीलने पोलिसांना केली आहे




आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मनोज पाटीलने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असेल, असा उल्लेख केला आहे. ठाण्यातील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या नावे मनोज पाटीलने ही सुसाईड नोट लिहिली असून त्यामधून साहिल खानला योग्य ती शिक्षा मिळावी, अशी मागणी केली होती. साहिल खान गेल्या काही दिवसांपासून आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असून त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचे मनोज पाटीलने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता. सध्या मनोज पाटीलवर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies