Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ रोजी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण I ४१ कोरोनामुक्त I गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



माणदेश एक्सप्रेस न्युज I आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाने दुसऱ्या लाटेत थैमान घातले होते. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले होते. अनेकांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. परंतु काल दिनांक १५ रोजी रुग्ण संख्या कमी आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत होता. पण आज दिनांक १६ रोजी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आल्याने चिंता वाढली आहे. तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.





बाधित मध्ये बुधीहाळ ता. सांगोला ०१, आटपाडी ०९, दडसवाडी लिंगीवरे ०१, दिघंची ०६, गळवेवाडी ०४, कौठुळी ०१, लेंगरेवाडी ०१, मापटेमळा ०७, नेलकरंजी ०१, निंबवडे ०१, पिंपरी खुर्द ०१, पुजारवाडी आ. ०१, शेरेवाडी विठ्ठलापुर ०२, शेटफळे ०३, उंबरगाव ०४, विठ्ठलापुर ०२, झरे ०१  या गावातील रुग्णांचा समावेश आहे.




आजच्या बाधित मध्ये पुरुष रुग्ण २० तर स्त्री रुग्ण २७ असे एकूण ४१ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies