Type Here to Get Search Results !

मतदार यादीतील नोंदीसाठी "या" हेल्पलाईन ॲपचा वापर करा I जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



 माणदेश एक्सप्रेस न्युज I सांगली :  भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेचे बळकटीकरण व समाजभिमुखता वाढावी यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदार यादीतील सर्व माहिती व नोंदीसाठी अद्ययावत असे व्होटर हेल्पलाईन ॲप विकसीत केले आहे. या ॲपचा उपयोग जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.






सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित जिल्ह्यात मतदार यादी संदर्भातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा जास्तीत जास्त उपयोग जिल्ह्यातील नागरिकांनी करावा. व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना फॉर्म नंबर 6, एकापेक्षा अधिक ठिकाणी असणारी नावाची नोंद किंवा मयत मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना फॉर्म नंबर 7, तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास नमुना फॉर्म नंबर 8, विधानसभा मतदारसंघातर्गंत पत्ता बदलण्यासाठी नमुना फॉर्म नंबर 8अ भरून मतदारांना आवश्यक ती दुरूस्ती करता येईल. मतदारांनी व्होटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करून घ्यावे तसेच nvsp.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील आवश्यक तो फॉर्म भरण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies