Type Here to Get Search Results !

दिलासादायक : आटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाबाबत दिलासादायक चित्र



आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेकांना आरोग्याच्या सोई-सविधा मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. वाढत्या कोरोना रूग्णामुळे आरोग्य विभाग देखील हतलब झाले होते. परंतु लसीकरणाचे प्रमाण वाढले आणि रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली.


गेल्या आठवड्यात आटपाडी तालुक्यातुन कोरोना हद्दपार झाला होता. गेली दोन आठवडाभर कोरोना बाधित रुग्ण संख्नयेला आळा बसल्याने नागरिकां बरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळाला आहे. 


आज झालेल्या Antigen टेस्ट पैकी प्राथमिक आरोग्य केंद्र आटपाडी, ग्रामीण रुग्णालय आटपाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र खरसुंडी या ठिकाणी एकाही रुग्णाची टेस्ट झाली नाही. तर दिघंची २२, करगणी १५ अशा एकूण ३७ नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून यापैकी एकही नागरिक कोरोना बाधित आढळून आला नाही. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies