Type Here to Get Search Results !

भारताने पार केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

 


 

पुणे: करोनाच्या पहिल्या टप्प्यात निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरण हे प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडले आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पूर्ण केला आहे.


करोनामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं नुकसान झाले. खूप जणांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली तर काही जण अगदी मरणाच्या दारातून परत आले. करोनाचे हे  भयंकर रुप देशाने पाहिले .काही काळ करोनाशी निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरणाचं प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडले  आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पूर्ण केला आहे.


देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पूर्ण केला आहे . करोना लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा पूर्ण  करू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार मानले आणि एक आवाहनही केले आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.



मोदी पुढे म्हणाले, त्याच वेळी, आपण सर्व कोविड-१९ संबंधित प्रोटोकॉलचे पालन करत राहूया. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे भारत आभारी आहे. आम्ही आमचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, नवोदित आणि लोकांचे लसीकरण करणार्याक आरोग्य सेवा कर्मचार्यांसचे आभार मानतो. मी सर्व पात्र नागरिकांना लस टोचून घेण्याचे आवाहन करतो. चला एकत्र, कोविड-१९ चा सामना करूया.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies