देशात करोनाची तिसरी लाट अत्यंत धोकादायकदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. शनिवारी गेल्या २४ तासांत १ लाख ४० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची  संख्या समोर आली आहे. सात महिन्यांनंतर सलग दुसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. याआधी शुक्रवारी १ लाख १७ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात २८ डिसेंबरपासून करोना रुग्णामध्ये वाढ होत आहे. या ११ दिवसांत दररोज २० टक्के अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. तर या ४ दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांची वाढ ४० टक्क्यांहून अधिक आहे.


देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ५२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात करोनाच्या ओमायक्रॉन बाधित ३०७१ रुग्ण समोर आले आहेत.अशा प्रकारे देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured