Type Here to Get Search Results !

‘बटन’ नामक नशेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये ‘बटन’ नामक नशेच्या गोळ्यांचे  अतिसेवन  केल्यानं एका 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आमिर मेहबूब शेख उर्फ लाला असे तरुणाचे नाव आहे. यानंतर या गोळ्या आणि सोल्युशनची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनवणी या तरुणाच्या आईनं केली  आहे. तर अशी विक्री आढळल्यास कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिले आहे . अंबरनाथ पश्चिमेच्या सिद्धार्थ नगर आणि भगत सिंग नगर परिसरात ही विक्री सर्रासपणे होत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे .अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात आमिर मेहबूब शेख उर्फ लाला हा तरुण वास्तव्याला होता. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आमिरच्या घरी आई-वडिल, दोन भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या आमिरला गेल्या काही दिवसांपासून सोल्युशन आणि बटन या नशेचं व्यसन लागलं होत. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्यानं बटनच्या गोळ्यांचं अतिसेवन केल्यानं त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . तिथे  तीन दिवस उपचार केल्यानंतर अखेर मंगळवारी संध्याकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्याने  त्याचे  निधन झाले . तरुण मुलाच्या अशा अचानक  निधनानं त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे . यानंतर नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या या बटन गोळ्या आणि सोल्युशन यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी मृत आमिरच्या कुटुंबीयांनी केली आहे.या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांना प्रतिक्रिया विचारली असता, पोलीस ठाण्यात अद्याप अशी नोंद नसून डॉक्टरांनी आमिरचा मृत्यू हा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्यामुळे झाल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा नशेच्या पदार्थांची विक्री होत असेल, तर त्यावर कारवाई करू, असं अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले  आहे.परंतु , या बटनच्या गोळ्या म्हणजे नेमकं काय असते ? याची डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे . अंबरनाथमधील डॉक्टर झुबेर शाह यांच्या म्हणण्यानुसार बटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या असतात. परंतु  या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जाऊ शकत नाहीत. हे शेड्यूल्ड ड्रग असल्यानं त्याची विक्री किंवा साठा करण्यावरही निर्बंध आहेत, असे  डॉक्टर झुबेर शाह म्हणाले आहे . तसेच  या गोळ्यांच्या सर्रास विक्रीवर पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे .Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies