Type Here to Get Search Results !

7 दिवसात 6 वेळा इंधन दरवाढीचा शॉक;जाणून घ्या आजचे प्रती दर....!मुबंई: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरु झाली  आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील बदलांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात येत येतात. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 7 दिवसात 6 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने  आज पेट्रोलचे दर 30 पैसे तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटर वाढवले आहेत. 22 मार्च पासून 28 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत


महाराष्ट्रातील आजचे  दर


पुण्यात पेट्रोलचा दर 113 रुपये 90 पैशांवर पोहोचला आहे. तर, डिझेल 96 रुपये 76 पैशांवर गेले आहे.


परभणीतील पेट्रोलचा दर 116.86 तर डिझेलचा दर 99.41 इतका आहे.


नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 114.42 तर डिझेलचा दर  97.34 इतका आहे. 


नांदेडमध्ये पेट्रोलचा दर 99.48 तर डिझेलचा दर 116.71 रुपये लिटर आहे.


रत्नागिरीतील पेट्रोल आजचा दर 115.33 तर डिझेलचा आजचा दर 98.45 इतका आहे.


मुंबईतील पेट्रोलचा दर 114.19 रुपये तर डिझेलचा दर 98.50 रुपये इतका आहे.


सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा दर 114.32 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 97.10 रुपयांवर पोहोचले आहे.


नागपूरमध्ये पेट्रोलचा एका लीटरचा दर 114.05 रुपये तर डिझेलचा दर 96.89 रुपयांवर पोहोचला आहे.


औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 115.20 वर पोहोचला आहे तर डिझेलचा दर 98.01 पोहोचला आहे.22 मार्च ते 28 मार्च या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 6 वेळा वाढवण्यात आल्या. तर, 24 मार्चला दरवाढ करण्यात आली नव्हती. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 30 ते 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत पेट्रोल 4 रुपये तर डिझेल 4.5 रुपयांनी महागले  आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies