Type Here to Get Search Results !

महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून पोलीस हवालदाराविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल


नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराच्या विरोधात याच ठिकाणी महिला पोलीस शिपाई म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. तर संबधित हवालदारानेही मारहाण आणि मोबाईल चोरी प्रकरणी त्या महिला शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.


 

आरोपीचे नाव रामदास सोनावणे आहे ते रबाळे वाहतूक पोलीस विभागात हवालदार म्हणून काम करतात तर फिर्यादी महिला या शिपाई पदावर काम करतात. सोनावणे यांनी फिर्यादी यांच्या परिचित रिक्षा चालकाला मारहाण केली होती. ती सोडवण्यास गेलेल्या या महिला शिपायालाही अर्वाच्च शिवीगाळ करत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यामुळे सोनावणे यांच्या विरोधात सदर महिला शिपाई कर्मचाऱ्याने विनयभंगचा गुन्हा दाखल केला. 




परंतु , याप्रकरणी एकालाही अद्याप अटक केलेले नाही. आम्ही योग्य ती  कारवाई करत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी डी ढाकणे  यांनी दिली आहे . या दोन्ही कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसापासून वाद असून आहेत  अशी माहिती अनेक वाहतूक पोलीस  दिली आहे . त्याचाच हा परिणाम असल्याची चर्चा वाहतूक विभागात होत आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies