Type Here to Get Search Results !

आटपाडीत आज वाढत्या पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन; चूल मांडून चुलीवर भाकरी करत मोदी सरकार चा निषेध!











आटपाडी: सध्या वाढत्या महागाई सर्वसामाण्याच्या खिशाला न परवडणारी आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या आगीत जनता होरपळून निघत आहे. तसेच, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाल्याने हा खर्च सामन्यासाठी खूप त्रासदायक ठरलेला असून पुन्हा भर पडली आहे.याचाच दाखला घेत आटपाडी तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने वाढत्या पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आज आंदोलन करण्यात आले. 







घटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उपाध्यक्ष इंजि. अनिता पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. तसेच, “ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत कमी होती, तेव्हा देखील मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी केले नाहीत आणि आता किंमत जास्त आहे, असे सांगून मोदी सरकार घरगुती गॅस व इतर इंधन दरवाढ करत आहे, हे योग्य नाही”, असे अनिता पाटील यांनी वक्तव्य केले आहे. तसेच गैस सिलेंडर चे दर २०० रुपयांनी कमी करावेत आणि पेट्रोल डिझेल चे दर अर्ध्या किमतीने कमी करावेत अशी मागणी केंद्र सरकार कडे पोहचवली जावी अशीही त्यांनी या आंदोलनातून विनंती केली आहे. 





त्याचप्रमाने, या आंदोलनात अनिता पाटील यांनी चूल मांडून चुलीवर भाकरी करून मोदी सरकार चा निषेध व्यक्त केला आहे,व “५० रुपयाने दर वाढ केलेल्या मोडी सरकारचे करायचं काय, खाली डोके वर पाय; कमी करा, कमी करा, इंधन दरवाढ कमी करा” अशा जोरदार घोषणा करत गॅस दरवाढी विरोधात आज आंदोलन संपन्न झाले. 







इंजि. अनिता पाटील (जि. उपाध्यक्ष), अश्विनी कासार (तालुका अध्यक्ष), वैशाली वाघमारे (तालुका उपाध्यक्ष), पुजा गुरव (सरचिटणीस), सुजाता टिंगरे (जि. सहसचिव), मनीषा पाटील ( ता.सदस्य), उज्वला सरतापे (आटपाडी शहराध्यक्षा), अश्विनी ठोकळे, नीता सावंत (ता. सदस्य), सुषमा खरात, शितल खरात, वैशाली वाघमारे (ता. सदस्य), वैशाली सरताळे (दिघंची शहराध्यक्ष), राणी धोंडीराम कुटे (तालुका सदस्य), सुजाता संजय तोरणे, स्वाती पुसावळे यांच्या उपस्थितीत आंदोलन संपन्न झाले आहे. 






रशियातून कमी दराचे कच्चे तेल आयात केल्यानंतर आता गॅस दरवाढ करण्याची काहीही गरज नव्हती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत चालू असताना, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष बॅरल कच्चे तेल अत्यंत कमी दरात आयात केले आहे. या आयातीमुळे अमेरिकेने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचे उल्लंघनहि झाले नाही. त्यामुळे सध्या कच्च्या तेलाच्या वाढीव किंमतीचा दाखला देऊन घरगुती गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies