Type Here to Get Search Results !

पहिल्याच सामन्यात केकेआरचा विजय; जाणून घ्या सविस्तर माहिती!





मुंबई: आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे. चेन्नईने दिलेले  १३२ धावांचे लक्ष्य केकेआरने जोरात सांभाळत सामना जिंकला  आहे. केकेआरच्या या विजयासाठी अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली असून गतविजेत्या चेन्नईला यावेळी केकेआरने पहिल्याच सामन्यात पराभूत केले आहे.



नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता . फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर जास्त काळ टिकू शकले नाहीत. चेन्नईने वीस षटकांत १३१ धावांचे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले होते . हे जोरदार आव्हान स्वीकारत केकेआरच्या खेळाडूंनी धडाकेबाज  खेळ केला आहे . केकेआरच्या अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या आहेत. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये १६ धावा करत संघाला विजयाची वाट करुन दिली. सॅम बिलिंग्सने २२ चेंडूंमध्ये २५ धावा तर नितीश राणाने १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. बिलिंग्स, राणा आणि अय्यरच्या या खेळामुळे केकेआरचा  विजय झाला.



रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने चांगला खेळ करत संघाला सावरले होते. धोनीने मोठे फटके लगावत ३८ चेंडूंमध्ये आपले अर्धशकत पूर्ण केले. तर रविंद्र जाडेजाने धोनीला साथ धेत २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. या दोघांनी ७० धावांची भागिदारी करत संघाचा धावफलक १३१ धावापर्यंत नेऊन पोहोचवला. परंतु, १३१ धावांचे लक्ष्य केकेआरने सहा गडी राखून चेन्नईचा जोरदार पराभव केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies