Type Here to Get Search Results !

‘वन मॅन आर्मी’ने चेन्नईला सावरले; ३८ चेंडूत धोनीचे अर्धशतक!





मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामाचा पहिला सामना मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये सुरु आहे. परंतु, या पहिल्याच सामन्यात गतविजेता चेन्नई संघ जशी असायला हवी तशी कामगिरी करु शकला नाही. परंतु, महेंद्रसिंह धोनीने संघ संकटात असताना पुन्हा एकदा त्यांनी आपला जोरदार डाव दाखवला आहे. त्याने ३८ चेंडूत ५० धावा करुन केकेआरला घाम फोडला आहे. धोनीच्या खेळाच्या जोरावरच चेन्नई संघ १३१ धावा करु शकला आहे.



रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने जोरदार खेळ करत संघाला सावरले. धोनीने मोठे फटके लगावत ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार तर एका षटकाराच्या जोरावर ५० धावा केल्या. तसेच, रविंद्र जाडेजाने २८ चेंडूंमध्ये २६ धावा करत धोनीला साथ दिली आहे. या दोघांनी ७० धावांची भागिदारी करत संघाला संघाचा धावफलक १३१ धावापर्यंत पोहोचवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies