Type Here to Get Search Results !

डिझेल चोरी प्रकरणात दोन बोटी जप्त ; अचानक आग लागून त्या आगीत खाक

 



मुंबई : जानेवारी महिन्यात डिझेल चोरी प्रकरणात दोन बोटीही जप्त केल्या होत्या. या बोटींना बुधवारी अचानक आग लागून त्या आगीत खाक झाल्या. अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र बोटींना चारही बाजूंनी लावण्यात आलेल्या टायरमुळे आग भडकली.


१० जानेवारी रोजी नवी मुंबई पोलिसांनी बेकायदा चोरीचे डिझेल विकणाऱ्या टोळीस अटक करून त्यांच्याकडील ३५ लाख २ हजार ७५० रुपयांचे २१ हजार ४७० लिटर डिझेल व दोन बोटी जप्त केल्या होत्या.  ही कारवाई नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा आणि राज्यस्तरीय दक्षता मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरीत्या केली होती. तसेच आरोपींनी ज्या बोटीतून डिझेल चोरी आणि नंतर स्वस्तात विक्री केली जात होती, त्या दोन बोटीही जप्त केल्या होत्या.  या बोटी एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील उरण उड्डाणपुलाखाली खाडीत लावल्या होत्या. या दोन्ही बोटींना बुधवारी सकाळी अचानक आग लागली.


 यात नेमके कोणत्या बोटीला अगोदर आग लागली हे समोर आले नाही. या बोटीतील २१ हजार ४७० लिटर  डिझेल अगोदरच काढून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. या बोटीतील डिझेल काढण्यात आले होते तरी त्यातील बॅटरीमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली असा आंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तरीही आग लावण्यात आली का याची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies