Type Here to Get Search Results !

“माझी हत्या करण्याच्या कटात पोलीस अधिक्षक सहभागी.....किरीट सोमाय्यांचे वादग्रस्त वक्तव्य!





महाराष्ट्र:  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांनी पोलिसांशी चर्चा केली आहे . परंतु, किरीट सोमय्या मुरूडला रिसॉर्टवर जाणार या भूमिकेवर ठाम आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या हे निलेश राणे यांच्यासोबत रिसॉर्टकडे निघालेले असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या हे दापोली पोलीस स्टेशनच्या दारातच आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत.



“किरीट सोमय्यांची हत्या करण्याचे कट कारस्थान दापोली पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक आणि शिवसेनेने केल्याचे दिसत आहे. मुंबईवरुन २०० गाड्यांच्या ताफ्यासह आम्ही आलो. पोलिसांनी चार जणांना आत येण्यासाठी सांगितले. पोलीस अधिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अर्धा किलोमीटर लांब पर्यंत अडवल्या आहेत आणि आता आम्हाला दोघांना जिथे जायचे आहे तिथे जा असे सांगत आहेत. म्हणजे हे पोलीस अधिक्षक माफियासेनेचे शाखाप्रमुख झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमचा घातपात करणार आहे हे पोलीस अधिक्षकांनी मला लिखीत स्वरुपात दिले आहे. आम्हाला रिसॉर्टवर जाऊ दिले जात नाही. माझी हत्या करण्याच्या कटात पोलीस अधिक्षक सहभागी होत आहेत,” असे किरीट सोमय्या यांनी जोरदार शब्दांत वक्तव्य केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies