Type Here to Get Search Results !

मोटारींच्या चार्जिंगसाठी करावा लागतो ३५ किलोमीटरचा प्रवास!




पुणे : विजेवर धावणारी वाहने खरेदी करण्याच्या धोरणाअंतर्गत महापालिकेने मोठा गाजावाजा करून अधिका-यांसाठी भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारींच्या चार्जिंगसाठी ३५ किलोमीटरचा प्रवास होत आहे. व्यवस्था नसल्याने मोटारी चार्जिंगसाठी भोसरीत न्याव्या लागत असल्यामुळे या मोटारींचा वापरही अल्प होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महापालिकेने अधिकारी वर्गासाठी वीजेवर धावणाऱ्या ३६ मोटारी भाडेतत्वावर घेण्यास मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात यातील आठ मोटारी महापालिकेच्या वाहन ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या मोटारींचा वापर सुरू केला आहे.  तरी चार्जिंग व्यवस्थे अभावी अनेकदा त्यांचा वापर करणे अडचणीचे ठरत आहे.



मोटारींचा वापर सुरू झाला असला तरी चार्जिंग व्यवस्था नसल्याने मोटारी भोसरी येथील एमआयडीसीतील खासगी चार्जिंग स्थानकावर न्याव्या लागत आहेत. हा प्रवास साधारपणे ३५ किलोमीटरचा आहे. महापालिकेचे कामकाज संपल्यानंतर संध्याकाळी चालकांना मोटारी चार्जिंगसाठी न्याव्या लागत असल्याने त्या नेण्यास टाळाटाळ होत आहे.



परंतु , भाडेतत्वावर मोटारी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कपनीची आहे. महापालिका ज्यावेळी स्वत: वाहने खरेदी करेल त्यावेळी महापालिकेची चार्जिंग व्यवस्था उभारण्यात येतील , असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies