Type Here to Get Search Results !

पेट्रोल-डिझेलच्या दरात पाचव्यांदा वाढ; जाणून घ्या आजचा दर!



मुंबई: देशात इंधनाचा वाढता दर  सुरूच आहे.गेल्या ६ दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. रविवारी म्हणजेच आज पेट्रोल ५० पैशांनी, तर डिझेल ५५ पैशांनी वाढले. त्यामुळे सहा दिवसात ३ रुपये ७५ पैशांपर्यंत ही इंधन दरवाढ झाली आहे. यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसून त्यांचे आर्थिक गणित कोलमडताना दिसत आहे.



मुंबईत पेट्रोलचे दर ११३ रुपये ३५ पैशांवरून ११३ रुपये ८५ पैसे झाले आहेत. तसेच, डिझेलचे दर ९७ रुपये ५५ पैशांवरून ९८ रुपये १० पैसे झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६१ पैशांवरून ९९ रुपये ११ पैसे झाले आणि डिझेल ८९ रुपये ८७ पैशांवरून ९० रुपये ४२ पैशांवर गेले आहे. देशभरात इंधनाच्या दरांचा मोठा भडका उडाला आहे. प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत.प्रत्येक राज्यांच्या स्थानिक कर आकारणीतील तफावतीमुळे या दरांमध्ये फरक आढळून दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies