Type Here to Get Search Results !

सीएनजी स्वस्त; किलोमागे ७ ते ८ रुपयांची घट!





मुंबई : अर्थसंकल्पातील घोषणेनुसार ‘सीएनजी’वरील मूल्यवर्धित करात दहा टक्के कपात करण्याची अधिसूचना काल जारी करण्यात आल्याने येणाऱ्या १ एप्रिलपासून हा वायू राज्यात प्रती किलो ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होईल.



मिळालेल्या माहितीनुसार, ‘सीएनजी’वर १३.५ टक्के मूल्यवर्धित कर आकारण्यात येतो. त्यात दहा टक्के कपात करून तो तीन टक्के करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. या आधारे, वित्त विभागाने करात कपात करण्याची अधिसूचना जारी केली असून ती राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.



नैसर्गिक वायूवर तीन टक्के मूल्यवर्धित कर आकारला जाईल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. हा बदल येणाऱ्या १ एप्रिलपासून प्रत्यक्षात येईल. या निर्णयामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. या सगळ्याचा फायदा रिक्षा, टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना तसेच त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. सीएनजीच्या दरात कपात झाल्याने प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, अशीही आशा पवार यांनी व्यक्त केला आहे. करात कपात केल्याने सरकारच्या उत्पन्नात  ८०० कोटींची घट होण्याची शक्यता आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies