Type Here to Get Search Results !

लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी; 'या' हॉस्पिटलमधील घटना!

 रायगड : लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर  जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आले आहे . रुग्णालयातील लिफ्टमध्ये बिघाड होऊन एकाच वेळी 9 डॉक्टरांना दुखापत झाली आहे . दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि ती काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली. या अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दलातील जवानांना पाचारण करण्यात आले . फायर ब्रिगेड जवानांनी डॉक्टरांची सुटका करत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आमले रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टूगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी झाल्यावर तिसऱ्या मजल्यावरून 9 डॉक्टर तळ मजल्यावर जेवणासाठी निघाले होते . परंतु दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली.डॉक्टरांनी अग्निशमन दलास पाचारण केले असता अग्निशमन दलातील जवानांनी तात्काळ या सर्व 9 डॉक्टरांना लिफ्टमधून बाहेर काढले. या दुर्घटनेत लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टर जखमी झाले आहेत. या सर्व डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली  असून या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies