Type Here to Get Search Results !

सौदी अरेबिया कच्च्या तेलाच्या किमती वाढवणार; आशियाई देशांना जोरदार फटका बसण्याची शक्यता!

 





नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये  युद्ध अजून चालूच आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहाणी झाली. तसेच, रशियाने युद्धबंदीचे घोषणा करावी यासाठी अमेरिकेसह युरोपातील सर्वच नाटोचे सदस्य असलेल्या देशांकडून रशियावर दबाव वाढवला जात आहे. अमेरिकेसह अनेक युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर होताना दिसून येत आहे. 



रशिया हा कच्च्या तेलाची निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे. परंतु, अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवल्याने दुसरीकडे सौदी अरेबियातील कच्चा तेलाला अचानक मागणी वाढली आहे. वाढलेली मागणी पहाता सौदी अरेबिया पुढील महिन्यात आशियाई देशांसाठी आपल्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



एका इन्टरनेट वाहिनीच्या वृत्तानुसार, सौदी अरेबिया आपल्या कच्च्या तेलाच्या किमती पुढील महिन्यांपासून आशियाई देशांसाठी वाढवू  शकतो. या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दर महिन्याला पाच ते दहा डॉलर प्रति बॅरलची वाढ होऊ शकतेअशी माहिती समोर येत आहे. तसे झाल्यास आशियाई तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची भीती दर्शवली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies