पुणे : थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धा काळाने त्यांचे दुःखद निधन झाले.
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या त्या आत्या होत्या व किर्तीताई फाटक यांच्या मातोश्री होत्या. आज सकाळी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनामुळे शिवेसनेच्या नेत्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.