Type Here to Get Search Results !

आयुक्तांनी आज बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक



पुणे :  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. शहरातील सर्वपक्षांच्या शहर अध्यक्षांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच शहराची सध्याची परिस्थिती पाहता कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्त करणार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.


 दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी सभा असल्याने देखील सुरक्षेच्या कारणास्तव बैठकीत चर्चा केली जाणार आहे. पुण्यात सध्या विविध आंदोलन होत असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. सर्वपक्षीय नेत्याची बैठक सकाळी ११.३० वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात होणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies