मोसमी वारे २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाजअनुकूल स्थितीच्या परिणामामुळे यंदा २७ मे रोजीच र्नैऋत्य मोसमी वारे देवभूमी केरळात दाखल होणार आहेत.

पुणे : अनुकूल स्थितीच्या परिणामामुळे यंदा २७ मे रोजीच र्नैऋत्य मोसमी वारे देवभूमी केरळात दाखल होणार आहेत. सरासरीपेक्षा चार दिवस अगोदरच र्नैऋत्य मोसमी वारे दाखल होणार असल्यामुळे यंदा या मोसमी वाऱ्यांची पुढील वाटचाल सुकर होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. दरम्यान, केरळमध्ये दरवर्षी ३० मे किंवा १ जूनच्या आसपास र्नैऋत्य मोसमी वारे दाखल होत असतात.

भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी प्रसृत केलेल्या दैनंदिन माहितीपत्रामध्ये म्हटले आहे, की दक्षिण अंदमान तसेच बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांना आगेकूच करण्यासाठी योग्य स्थिती तयार झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टय़ांची निर्मिती र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांना पुढे नेण्यासाठी अनकूल आहे.

सरासरी २२ मेच्या आसपास अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होणारे र्नैऋत्य मोसमी वारे यंदा १५ मे रोजीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. तसेच आता अनुकूल स्थितीमुळे र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये निश्चितपणे २७ मेपर्यंत दाखल होण्याची सुवार्ता हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured