अनुसूचित जाती जमातीचे प्रभाग जाहीर

 


पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी कोणते प्रभाग आरक्षीत असणार याची यादी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी दोन तर अनुसूचित जातीसाठी २३ प्रभाग आरक्षीत असणार आहेत. पुणे महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात तीन सदस्य असणार आहेत. नगरसेवकांची संख्या १७३ इतकी असणार आहे. ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग तीन सदस्यांचे व एक प्रभाग दोन सदस्यांचा असणार आहे.


निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर परिशिष्ट जाहीर केले आहे. त्यामध्ये २०११ ची ३५ लाख ५६ हजार ८२४ लोकसंख्या गृहीत धरली आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची ४ लाख ८० हजार १७ तर, अनुसूचित जमाती लोकसंख्या ४१ हजार ५६१ आहे. त्यानुसार २३ प्रभाग अनुसूचित जातीचे आहेत. २ प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत केले आहेत.


अ आणि ब जागा आरक्षीत

तीन सदस्यांचा प्रभागाची विभागणी अ, ब आणि क अशी केली आहे. त्यामध्ये संबंधित प्रभागातील अ जागा ही अनुसूचित जातीसाठी आरक्षीत असेल तर ब जागा ही जमातीसाठी आरक्षीत केली आहे. अनुसूचित जातीच्या २३ पैकी १२ जागा व अनुसूचित जागेची एक जागा जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल, असे निवडणूक शाखेचे उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured