Type Here to Get Search Results !

कच्च्या तेलाच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल- डिझेल दर!नवी दिल्ली: आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. पण तरीही आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला  नाही. आजही देशांतर्गत तेलाच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ०.८% वाढून प्रति बॅरेल १०८ डॉलरवर पोहोचले. तर, यूएस डब्ल्यूटीआय क्रूड फ्युचर्स प्रति बॅरेल ९७.५१ डॉलरवर पोहचले. सलग दुसऱ्या आठवड्यात, ब्रेंट क्रूडमध्ये एका आठवड्यात ५ टक्केंची वाढ नोंदवली आहे. तुमच्या  शहरातील पेट्रोल- डिझेल चे दर खालीलप्रमाणे:

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies