Type Here to Get Search Results !

नाल्यात पडल्याने बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू!



नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. आज सकाळी नाल्याच्या पाण्यात तोल जाऊन पडल्याने बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घातली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  नाशिक-  औरंगाबाद रोड शिलापूर येथे ही घटना घडली आहे. कृष्ण दीपक गांगुर्डे वय १२ असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घराजवळ खेळत असताना ही घटना घडली आहे. आई, वडिल शेतात चारा आणण्यासाठी गेले होते, यावेळी तो मुलगा पाठिमागून गेला तेव्हा त्याचा तोल जावून तो या नाल्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.


दरम्यान, आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृताची नोंद करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies