Type Here to Get Search Results !

“नुपूर शर्मांचा शिरच्छेद करणाऱ्याला बक्षीस म्हणून माझं घर देईन”!


राजस्थान: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद जगभरात उमटले. "नुपूर शर्मा यांचं शीर कापून आणणाऱ्याला मी माझं घर देईन" असं खळबळजनक आवाहन एका खादिमांनी केलं आहे. जगप्रसिद्ध सूफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याच्या खादिमांनी नुपूर शर्माला ठार मारण्याची धमकी दिली आहे. सलमान चिश्तीने नुपूर शर्मावर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



या व्हिडीओ मध्ये खादिम सलमान चिश्ती हा नुपूर शर्माला गोळ्या घालून ठार मारण्याबाबत बोलत आहे. तसेच सलमान चिश्तीने म्हटले आहे की, जो कोणी नुपूर शर्माची हत्या करेल, त्याला बक्षीस म्हणून पैसे आणि घर देईल. सलमान चिश्तीने नुपूर शर्माचे शीर कापणाऱ्याला त्याचे घर देण्याचा दावा आहे. 



दरम्यान,  अजमेर शहरातील अलवर गेट पोलिस ठाण्यात सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies