Type Here to Get Search Results !

सांगली: माजी नगरसेवकाने पत्नीला फूस लावून नेले पळवून; पतीची पोलिसात धाव!



आष्टा : वाळवा तालुक्यातील विवाहित महिलेला माजी नगरसेवकाने पळवून नेल्याची तक्रार संबंधित विवाहितेच्या पतीने आष्टा पाेलीस ठाण्यात दिली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी कि,  संबंधित महिला आठ-दहा दिवसांपासून बेपत्ता आहे. तिच्या पतीस एका माजी नगरसेवकानेच तिला पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे तो आठ दिवसांपूर्वी संबंधिताकडे पत्नीबाबत चौकशी करण्यासाठी गेला. यावेळी संबंधित माजी नगरसेवकाने त्याला मारहाण करून धमकी देऊन हाकलून दिले. ‘पोलिसांकडे गेल्यास गाठ माझ्याशी आहे’ अशी धमकी दिल्यामुळे महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली नव्हती.


दरम्यान,  शनिवारी बेपत्ता पत्नीबाबत चौकशी केल्याच्या रागातून संबंधित माजी नगरसेवकाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे त्यानेच आपल्या पत्नीस फूस लावून पळवून नेले असून, त्याची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या पतीने केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies