Type Here to Get Search Results !

चिखलाच्या रस्त्यामुळे ८ वर्षीय मुलाचा मृत्यू!



औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात चिखलाच्या रस्त्याने एका 8 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी वडील मोटार सायकलवरून दवाखान्यात नेत असताना मोटार सायकल रस्त्यामध्ये झालेल्या चिखलात फसली आणि दवाखान्यात जाण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा बाबुलाल परदेशी असे मृत मुलाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील जुने लखमापूर येथील आठ वर्षीय कृष्णाच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या. या दरम्यान त्याला  उलटीही झाली. त्यामुळे वडिलांनी त्याला उपचारासाठी गंगापूर येथील रुग्णालयात मोटार सायकलने जात असताना त्यांची मोटार सायकल चिखलात फसली. ती बाहेर काढण्यात त्यांचा बराच वेळ गेला. त्यावेळी दुसरे वाहनही येत नव्हते. त्यामुळे कृष्णाला वेळेवर उपचार मिळाले नाही अन् रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. 



दरम्यान,  या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies