Type Here to Get Search Results !

‘या’ तारखेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार?



मुंबई: एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी  तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे.   

शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने 20 मंत्रिपदांची मागणी केली आहे. पण त्यांना 15 मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात  आहे. 



दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गट फुटेल, असे म्हणत खैरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies