Type Here to Get Search Results !

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू; एक जखमी!



लातूर - जिल्ह्यातील उदगीरपासून सात किलोमीटर अंतरावर अहमदपूर रोडवर एका ट्रक चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जानवळ येथील दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला आहे. तसेच,  दुचाकी चालकाची पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.



उदगीर ते अहमदपूर रोडवरील हकनकवाडी पाटी ते तोंडार पाटीच्या दरम्यान उदगीरहून अहमदपूरकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विजय बाबुराव राठोड हे जागेवरच ठार झाले. तर दुचाकी वरील मयत विजय राठोड यांच्या पत्नी रेणुका राठोड या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी उदगीरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



दरम्यान, घटनास्थळावरून ट्रक चालकाने ट्रकसह पळ काढला होता. उदगीर ग्रामीण पोलिसांनी ट्रक सह चालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शामराव लक्ष्मण राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies