Type Here to Get Search Results !

ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचे मोठे ट्विट व्हायरल; म्हणाले, बाळासाहेबांची शपथ...!



मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत मोठे ट्विट केले आहे.



संजय राऊत म्हणाले, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र., अस ट्विट खासदार संजय राऊत यांनी करत प्रतिक्रिया दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies