Type Here to Get Search Results !

अर्जुन खोतकर शिंदे गटात होणार सामील? मराठवाड्यातही शिवसेनाला पडणार खिंडार?



औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार, खासदारांसह अनेक शिवसेना पदाधिकारी तसेच नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. शिवसेनेचे जालन्यातील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.



सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या मध्यस्थीने अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची बुधवारी दिल्लीत  भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.  त्यामुळे आता मुंबई, ठाणे पाठोपाठ मराठवाड्यातही शिवसेनाला खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे.



दरम्यान,  सध्या अर्जुन खोतकर हे ईडीच्या रडाडवर आहे. त्यामुळे ईडीची पीडा टळावी म्हणून खोतकर हे शिंदे गटात सामील होऊन भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies