Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट; मंत्रिमंडळ खातेवाटपावर चर्चा?



नवी दिल्ली:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री (८ जुलै) भेट घेतली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच खातेवाटपावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारला केंद्राचा पाठिंबा तसेच सहकार्य मिळावे यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना विठ्ठल रखुमाईची खास मूर्ती भेट दिली.



राज्यात शिंदे गट- भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांनाच शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळणार आणि भाजपाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचीदेखील भेट घेणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला खास महत्त्व आले आहे.



दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर १३ मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे असू शकतात, अशी माहित समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies