अखेर17 तास चौकशीनंतर संजय राऊतांना अटक!मुंबई: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री ईडीने  अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. 


दरम्यान, आज सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केले जाणार आहे. काल सकाळीच ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झाले होते. या पथकाने दिवसभर घरामध्ये राऊतांची चौकशी आणि छापेमारी केली. त्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणले. या कार्यालयात सुमारे साडेसात तास राऊतांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured