आजचे दिनविशेष; जाणून घ्या महत्वाच्या घटना!आटपाडी: आज 1 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील पहिला सोमवार. त्याचबरोबर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 1 ऑगस्ट : नागचतुर्थीचा उपवास (भावाचा उपवास) 

नागचतुर्थीच्या उपवासाला भावाचा उपवास सुद्धा म्हणतात. श्रावणात माहेरवाशी माहेरी येतात. बऱ्याच परंपरेत नागाला माहेरवाशीनी भाऊ समजतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी माहेरवाशीनी भावाच्या नावाने उपवास करतात त्याला नागाचा उपवास म्हणतात. 1 ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार 

1 ऑगस्टलाच पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. 


 

2004 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाची स्थापना झाली. 3 ऑगस्ट 2004 रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

 

1920 साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, शिक्षक, समाजसुधारक, जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचे निधन.

 

1920 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक,लेखक, शाहीर तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured