Type Here to Get Search Results !

3 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह; डॉक्टर तरुणीने केली आत्महत्या!



औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि दिराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  डॉक्टर तरुणीचे धनंजय मोरे यांच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही तीन महिन्यांपूर्वी लग्नही केले होते. पण लग्नाच्या काही महिन्यांतच डॉक्टर तरुणी तणावाखाली होती आणि त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून पाच दिवसांपूर्वी स्वतः रक्तवाहिनित इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले होते, तेव्हापासून तिच्यावर गाठी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. परंतु, डॉक्टर तरुणीच्या खोलीत पाच पानांची सुसाईड नोटी सापडली आहे. 'मम्मी पप्पा मला माफ करा' असे तीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. 



दरम्यान, या प्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि दिराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies