Type Here to Get Search Results !

चुलत भावानेच नऊ महिने केला बहिणीवर अत्याचार; बहिणीने केली आत्महत्या!



औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्या प्रकरणी विरगाव पोलिसांनी चुलत भावास अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यात चुलत भाऊच आपल्या बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, याप्रकरणी विरगाव पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies