Type Here to Get Search Results !

आटपाडी : भरवस्तीत असलेल्या सॉ-मिल च्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : स्वातंत्र्यदिनी करणार नागरिक आंदोलन

 


आटपाडी : येथील भरवस्तीत असलेल्या सॉ-मिल च्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने स्वातंत्र्यदिनी नागरिक आंदोलन करणार आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी शहरातील ऐवळे गल्ली येथील भरवस्तीच्या मध्ये लाकडी कापण्याची सॉ-मिल आहे. या सॉ-मिल च्या त्रासाबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा वनक्षेत्रपाल यांना निवेदन देवून सुद्धा याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक व आटपाडी ग्रा.पं.चे माजी सदस्य आनंदराव ऐवळे यांनी प्रशासनावर केला आहे.


या सॉ-मिल मुळे गेली अनेक वर्षापासून तेथे राहत असलेल्या लोकांना मोठया प्रमाणात त्रास होत आहे. या मिलचा कर्कश आवाज, त्याच बरोबर मिलच्या कामामुळे लाकडी भुशाची धुळ तयार होऊन तेथे रहात असलेल्या लोकांच्या घरामध्ये येत असते. या भुशामुळे अनेक लहान मुलांना व वयोवृध्द लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. सदरची सॉ-मिल या वस्तीमध्ये असल्यामुळे या मिलच्या आसपास अनेक घरे असल्याने व मिल मध्ये येणाऱ्या मोठ्या लाकडांमुळे घरे हादरून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत. 


सदर मिलच्या विरोधात अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत. सदरची मिल ही मानवी वस्तीमध्ये असल्याने त्या ठिकाणी रहात असलेल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा प्रदुषण मंडळाचा अहवाल असतानाही सदर मिलचे मालक आपले राजकीय बळ व अधिकाऱ्यावरती दबावतंत्र व आर्थिक व्यवहारच्या माध्यमामुळे या मिलवरती कायम स्वरूपी कारवाई होत नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


आटपाडी वनक्षेत्रपाल श्री. खाडे यांच्याकडे याविषयांसंबधी माहिती देण्यासाठी गेलो असता त्यांचेकडून उध्दटपणाचे वर्तन होत असते. त्यामुळे अशा भ्रष्ट्र अधिकाऱ्यावरती कारवाई होऊन सदरची मिल कायमस्वरूपी त्या ठिकाणीहून हलविणेत यावी.

आनंदराव ऐवळे 

संचालक-बाजार समिती, आटपाडी 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies