Type Here to Get Search Results !

शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ते ट्विट व्हायरल I स्पष्टीकरण देताना म्हणाले....



मुंबई : औरंगाबाद पश्चिम चे आमदार शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आणि चर्चांना उधाण आले. शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘कुटुंबप्रमुख’ असा उल्लेख करत केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच उद्धव ठाकरेंनी विधानसभेमध्ये दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करताना हा उल्लेख शिरसाट यांनी केलं आहे. मात्र, काही वेळानी त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. त्यामुळे शिरसाट आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरु असतानाच आता यासंदर्भात शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे.




“महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब”, अशा कॅप्शनसहीत आमदार संजय शिरसाट यांनी ट्विट केले होते. या ट्विटवरुन उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. अगदी शिरसाट पुन्हा ठाकरेंसोबत जाणार पासून हा राजकीय डावपेच असल्यापर्यंत आणि मंत्रीपदासाठी शिरसाटांनी वापरलेलं हे दबावतंत्र असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र आता यासंदर्भात शिरसाट यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. 


यासंदर्भात स्पष्टीकरण देताना आम. शिरसाठ म्हणाले, माझ्या ट्विटर अकाऊंटवरुन अचानक एक ट्विट पोस्ट झाले. हे मार्च महिन्यामधील ट्विट असून ते आता पोस्ट झालं. ते ट्विट चुकीचं असल्याने ताबडतोब ते तिथून काढले आहे,” असे उत्तर दिलं. “मला जेव्हा कळालं की ट्विटरच्या माध्यमातून हे पोस्ट झालं आहे तर तातडीने ते काढलं. ते चुकून फॉरवर्ड झालेलं ट्विट होतं. त्याचा चुकीचा अर्थ किंवा चुकीचा समज करुन घेऊ नये.


हे ही वाचा :- आटपाडी : भरवस्तीत असलेल्या सॉ-मिल च्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : स्वातंत्र्यदिनी करणार नागरिक आंदोलन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies