Type Here to Get Search Results !

आटपाडी पंचायत समितीच्या ग्रामसेवकांनी केला कवठेमहांकाळच्या तहसिलदारांचा निषेधआटपाडी : महिला ग्रामसेविकेला अपमानास्पद वागणुक दिल्याबद्दल आटपाडीच्या ग्रामसेवकांनी कवठेमहांकाळच्या तहसिलदारांचा देवून दंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.


याबाबत अधिक माहिती अशी, कवठेमहांकाळ येथे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पी.एम. किसान पोर्ट डाटा भरणेबाबत तालुकयातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची संयुक्त बैठक आयोजित केळेली होती. सदर बैठकीत पी.एम.किसान पोर्टल डाटा हा. विषय संपलेनंतर ओळखपत्रास आधार लिंक करणे या कामाचा आढावा घेनेस तहसिलदार यांनी सुरुवात केली. 


मतदान कामाचा आढावा घेण्यास सुरूवात केली असता, प्रत्येकी बी.एल.ओ. यांचा आढावा घेतेवेळी महिला ग्रामसेविका सुरेखा भोसले यांना अपमानास्पद वागणुक देवुन त्यांच्या कार्याची लाज काढली. त्याचवेळी महिला संघटनेच्या अध्यक्षा व सर्व महिलांनी अपशब्द न वापरणे बद्दल 'तहसिलदार बी.जी.गोरे. यांना विनंती केली, तरीही तहसिलदार यांनी “तुमची लाज काढणेचा अधिकार मला आहे” अशा भाषेत संबंधित महिलांची विनंती घुडकादुन लावली व सदर पिढीत ग्रामसेविकेला भर सेत रडविले.


वास्तविक पाहता भारत निवडणुक आयोगाच्या दि.०४/०७/२०२२ च्या पत्रानुसार जिल्हाधिकारी सांगली यांनी सादर केलेल्या प्रेसनोट नुसार सदरचा कार्यक्रम हा 'दि.०१/०८/ २०२२ ते दि.०१/०४/ २०२३ पर्यंत चालू असुन सदरचा कार्यक्रम हा मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे. असे असतानाही जाणीवपुर्वक आढाव्यामध्ये महिलांचा अपमानास्पद वागणुक देणे हा महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय निंदनीय, अशोभनीय ब घृणास्पद प्रकार आहे. 


त्यामुळे महिलांचेबाबतीत अपमानास्पद वागणुक व महिलांचे मानसिक व शारिरीक खच्चीकरण करण्याचा हेतपुर्वक प्रकार तहसिलदार बी.जी गोरे यांनी केलेला आहे. त्यामुळे सर्व ग्रामसेवक संवर्गाच्या भावना दुखाविलेल्या आहेत. त्यामुळे तहसिलदार बी.जी.गोरे. यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांची चौकशी होवून जो पर्यंत कार्यवाही होत नाही तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तहसिलदार व त्यांच्या विभागाने बोलविलेल्या कोणत्याही सभेला हजर राहणार नसल्याचे निवेदन देण्यात आले आहे. 


यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष आनंदा मोरे, सचिव धर्मराज ऐवळे यांच्यासह ग्रामसेवक संजय कर्णे, दिपक देशमुख, धिरज मोरे, विजय मेटकरी, शहाजी रणदिवे, पूनम गेजगे, दत्तात्रय गळवे, महादेव कांबळे, लखन सनदी, तुकाराम कोळपे, संदीप वळवी आदी उपस्थित होते. 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies