Type Here to Get Search Results !

“आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय...”; ‘यांची’ ठाकरेंवर टीका!



मुंबई: सध्या दोन मातोश्री असून आम्ही तीन मजली मातोश्रीचे पावित्र्य राखतो.  आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात अशा शब्दात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिंदे गटाकडून विधानभवनाच्या पायऱ्यावर आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 



भरत गोगावले यांनी म्हटले की, आम्ही पोस्टर, बॅनरच्या माध्यमातुन वस्तुस्थिती मांडली आहे. सध्या मातोश्री दोन झाल्या आहेत. एक मातोश्री तीन मजली असून दुसरी मातोश्री आठ मजली आहे. आम्ही तीन मजली मातोश्रीचे पावित्र्य राखतोय. आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात असे गोगावले यांनी म्हटले. 



दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधली असल्याची चर्चा होती. या इमारतीला मातोश्री-2 असे संबोधण्यात येते. राज्यात भाजप-शिवसेनेची 2014 ते 2019 दरम्यान सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री-2 च्या भूखंडासाठी मदत केली असल्याचे म्हटले जात होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies