Type Here to Get Search Results !

कारची समोरासमोर धडक; आई आणि मुलाचा जागीच मृत्यू!



बीड: बीड-परळी मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे आणि त्यांच्या नऊ वर्षाचा मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे आपल्या ९ वर्षाच्या मुलाला घेऊन रुग्णालयात जात होत्या. यावेळी बीड-परळी मार्गावर समोरुन येणाऱ्या गाडीची धडक बसली. या धडकेत दोन्ही गाड्या उडून रस्त्याच्या बाजूला पडल्या. या घटनेत कोमल शिंदे आणि त्यांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला. गाडी चालक पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटळे आणि परळीचे शासकीय डॉक्टर इलियाज अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.



दरम्यान, जखमींना शिरसाळा पोलिसांनी तात्काळ अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies