Type Here to Get Search Results !

सांगली :जयंत पाटलांनी विठाई बसचे स्टेअरिंग हाती घेत शहरातून मारला फेरफटका!



सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर बस आगारात एसटीचे सारथ्य करीत चालकाचा अनुभव घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचे स्टेरिंग त्यांनी हातात घेतले. एसटी चालवत शहरातून फेरफटका देखील मारला. 



एसटीच्या ड्रायव्हर सीटवर जयंत पाटील बसल्याचे व ते बस चालवत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. एसटी चालक म्हणून अनुभव घेत, एसटी चालकांच्या सोबत यावेळी त्यांनी संवाद साधला. तसेच, त्यांच्याकडून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. 



दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि  त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies