Type Here to Get Search Results !

केळी खाल्ल्याने होतो कॅन्सरपासून बचाव; जाणून घ्या अधिक माहिती!



आटपाडी:  तुम्हाला कॅन्सरपासून स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर, आहारात केळ्याचा समावेश नक्की करा. केळी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे आपल्या शरीराचं अनेक आजारांपासून संरक्षण होते. दरम्यान, एका अभ्यासात समोर आले आहे की, केळ्यामुळे कॅन्सरपासून संरक्षण होऊ शकते. केळी खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.


संशोधनानुसार, केळ्याच आहारात समावेश केल्याने तुमचं कॅन्सरपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. केळ्यामधील रजिस्टेंट स्टार्च यामध्ये परिणामकारक ठरते. केळ्याशिवाय इतर भरपूर प्रमाणात रजिस्टेंट स्टार्च असलेल्या खाद्यपदार्थांमुळेही तुमचे कॅन्सरपासून संरक्षण होईल. 



दरम्यान,  दररोज 30 ग्रॅम रजिस्टेंट स्टार्च खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते. 30 ग्रॅम रजिस्टेंट स्टार्च एक कच्च्या केळीच्या समान आहे. संशोधनात, सुमारे 10 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर डेटा गोळा करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies