Type Here to Get Search Results !

अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने पतीची निर्घुण हत्या ; न्यायाधीशाने दिला निर्णयसावंतवाडी : प्रियकराबरोबरच्या अनैतिक संबंधात येत असलेला अडथळा कायमचा दूर करण्याच्या हेतूने  प्रियकराला सोबत घेत पती विजयकुमार गुरव यांची निर्घृण हत्या घडवून आणणाऱ्या पत्नी श्रीमती जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र  न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी दोषी ठरवले आहे. आता सोमवारी निर्णय दिला जाणार आहे.

पेशाने शिक्षक असलेले विजयकुमार गुरव हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगावचे सुपुत्र ते आर्थिक दृष्टय़ा खूप सदन होते. त्यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव हिचे त्याच गावात राहणाऱ्या सुरेश चोथे या पोल्ट्री व्यावसायिकाशी प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध नवरा विजयकुमार यांना समजतात त्यांनी त्याला विरोध केला. या विरोधामुळे संतप्त झालेल्या जयलक्ष्मीने आपल्या नवऱ्याचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रयत्न सुरेश चोथे याच्या मदतीने कट रचला आणि ६ नोव्हेंबर २०१७ च्या मध्यरात्री राहत्या घरातील बेडरूममध्ये सुरेश चोथेच्या मदतीने डोक्यावर खलबत्त्यातील लोखंडी प्रहार करून निर्घृण हत्या केली. 

या प्रकरणी माजी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी तपास करून या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले होते. विशेष सरकारी वकील अजित भणगे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies